Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Tuesday, 19 April 2016

ज्ञानरचनावाद गृहितके

ज्ञानरचनावाद गृहितके

ज्ञानरचनावाद गृहितके

१)विद्यार्थी स्वत:चे स्वत: कृती करून शिकतील.
२)स्वत:च्या प्रेरणेने शिकेल  व आवडीनुसार कृती करतील.
३)अनेक प्रकारचे अनुभव विद्यार्थांना मिळतील व आत्मविश्वास वाढेल.
४)विद्यार्थी सतत काहीतरी कृती करत करत शिकतील.
५)विद्यार्थी एकमेकांना मदत करतील.
६)विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करतील.
७)मुल स्वत:च्या गतीने शिकतील.            
८)मुलांना अध्ययनाच्या अनेक संधीचा अनुभव  मिळेल.
९)विद्यार्थांना निवडीचे स्वातंञ्य मिळेल.
१०)शिक्षणातील एकसारखेपणादूर होईल.
११)विद्यार्थांच्या कृतीला प्रोत्साहन मिळेल.
१२)शिक्षणातील आंतरक्रीया प्रभावी होईल.
१३)सहअध्ययनामुळे विद्यार्थातील सामाजिकता वाढेल.
१४)आपणहून शिकणे या शिकण्याच्या नैसर्गिक प्रवृतीला चालना मिळेल.
१५)स्वातंञ्य, स्वयंस्फुर्ती,कल्पकता, निर्मितीक्षमता या गुणांना पोषक वातावरण मिळेल.
१६)मुक्त अभिव्यक्तीची संधी मिळेल.
१७)विद्यार्थी प्रकटीकरणाचे स्वातंञ्य अनुभवेल.
१८)समस्या सोडविण्यासाठी आवश्यक गुण विद्यार्थात येतील.
१९)शिक्षणातील छोटी छोटी आव्हाने पेलण्याचे स्वातंञ्य मुलांत विकसित होईल.
२०)विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करू शकेल. म्हणजेच ज्ञानाचा रचियता असेल.
२१)विद्यार्थांत शोध घेण्याची वृती वाढेल.
२२)तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी शिकेल.
२३)जिज्ञासा ,उत्सुकता वाढीस लागेल.
२४)स्वंय अध्ययनाची सवय लागेल.
२५)शिक्षणप्रक्रीया आनंददायी होईल.
२६)मुलांना शिकण्यास आवडेल,परंतु केवळ पाठांतर करणे आवडणार नाही.
२७)विद्यार्थांना अभ्यासात रमणे आवडेल.