Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Wednesday 30 December 2015

मुख्याध्यापकांची कामे- RTE-2009 नुसार कामे

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे


१) वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश दयावा. 
 शाळेत दाखल करतांना पालकाजवळ वयाबाबतचा सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले पाहिजे.

२) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे.
    बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा.

३) विदयार्थ्याचे स्थलांतरण 
पालकाचे अथवा बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास
विदयार्थ्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र घ्यावे. असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा दाखला हस्तांतरण करावा.

४) वयानुसार प्रवेश- 
एखादा बालक दुस-या ठिकानावरून गावात राहण्यासाठी येत असेल तर त्याला त्याच्या वयोगटानुसार प्रवेश दयावा. नंतर त्याचा दाखला मिळत असल्यास प्रयत्न करावे. बालक पुन्हा शाळाबाहय होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे.
५) विशेष गरजा असलेल्या बालकाचे शिक्षण
 विशेष गरजा असलेल्या बालकास प्रवेश देवून त्याच्या गरजाकडे विशेष लक्ष पुरविण्यात यावे. त्यास उनीव भासवू नये.

६) वंचित व दुर्बल घटकातील बालकाचे प्रवेश व शिक्षण-
  वंचित व दुर्बल घटकातील बालकास शिक्षण हक्क अधिनीयम २००९ अन्वये २५% प्रवेश देण्याचे बंधन प्रत्येक शाळांवर लागु आहे. व शिक्षणाबाबत उदासीन धोरण ठेवू नये. तसेच सामाजिक व आर्थिक
दरी निर्माण होईल असे भासविता कामा नये. इतर बालकासोबत त्यालाही समान संधी देण्यात याव्यात.

७) बालकाचे सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन
 या कायदयानुसार यापुढे कोणत्याही बालकास मागे ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याला पुढील वर्गात
प्रवेश देतांना मागील वर्गातील अपेक्षीत संपादणुक पातळी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्या करिता
अतिरिक्त अध्यापनाची गरज असल्यास नियोजन मुख्याध्यापकांनी करावे.

८) शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य-
शिक्षण हक्क अधिनीयम २००९ अन्वये प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. समितीचे वेळोवेळी शैक्षणिक विकासाकरिता आढावा बैठकी बोलावण्यात याव्या व त्याप्रमाणे नियोजन करावे.

९) शालेय आपत्ती व्यवस्थापन
अ)नैसर्गिक आपत्ती
१) भुकंप २)महापूर ३) वादळे ४) वीज कोसळणे ५) वणवा लागणे ६) दरड कोसळणे ७) वृक्ष कोलमडणे ८)त्सुनामी लाटा ९) प्राण्यांचा हल्ला होणे (उदा- कुत्रा चावणे, सर्प दंश, मधमाशी चावणे, इतर प्राण्यांपासून दुखापत होईल असे) १०) थंडीची लाट येणे ११) अतिउष्मा १२) अतिवृष्टी १३) अनावृष्टी/दुष्काळ पडणे.
ब)मानव निर्मित आपत्ती-
१) आग लागणे २) अपघात ३) विजेचा धक्का लागणे(शॉक) ४) इमारत कोसळणे ५) बॉम्ब स्फोट होणे ६)विषारी वायू गळती होणे ७) चेंगराचेंगरी होणे ८)विषबाधा होणे ९) विदयार्थी अपहरण १०) अचानक उद्भवणारे आजार (उदा-फिट,चक्कर, लखवा, मिरगी, दमा सारखे इतर)

उपाययोजना
१) शिक्षक विदयार्थी यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन देणे.
२) विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागृती करणे.
३) आपत्ती व्यवस्थापनावर आधारित माहितीपट दाखविणे.
४) तज्ज्ञ व्यक्तिंची व्याख्याने आयोजीत करणे.
५) स्काउट/गाईड सारख्या चमूंना विशेष प्रशिक्षण देणे.
६) एखादया तज्ञ शिक्षकाची स्पेशल नेमणुक करणे.
७) एखादा आराखडा आखून ठेवणे.
८) आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करणे.
९) विद्युत यंत्रणा, प्रथमोपचार यंत्रणा, अग्नीशामनयंत्रणा, वाळूची यंत्रणा,  पाणी यंत्रणा, सुसज्ज ठेवणे.
१०) धोकादायक बाबींची विशेष काळजी ठेवणे.
११) शालेय परिसरात ज्वालाग्रही पदार्थ तत्सम वस्तुंवर बंदी घालणे.
१२)गरजेनुसार इमारतीची दुरुस्ती करणे.
१३) येजा करणा-या विद्यार्थ्यांना सुचना देणे.
१४) वाहतुक सुरक्षा समिती गठीत करणे.
१५) पोषण आहाराजवळ सुरक्षीतता ठेवणे /पोषण आहार सुरक्षीत स्थळी ठेवणे.
१६) पालकांचा,तज्ज्ञ व्यक्तींचा, डॉक्टरांचा, वाहनधारकांचा संपर्क क्रमांक दर्शनी मांडून(लिहून) ठेवणे.
शासन निर्णय
१)२२जुलै २००४ २) ५ ऑगस्ट २००४ ३) ६ सप्टेंबर २००४

संदर्भ सुची मुख्याध्यापक मार्गदशिका भाग २


शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१)विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
दाखल खारीज रजिस्टर,
पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
जन्म प्रमाणपत्र फाईल,
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
टी.सी. फाईल,
टी.सी. जावक रजिस्टर,
निकाल रजिस्टर,
बढती रजिस्टर,
गळती रजिस्टर,
मूल्यमापन नोंदवही,
बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
अपंग विद्यार्थी रजिस्टर
२)शिक्षकांसंबंधी अभिलेखे
शिक्षक हजेरी रजिस्टर,
पगारपेड रजिस्टर,
शिक्षक सुचना रजिस्टर,
शिक्षक हलचल रजिस्टर,
शिक्षक रजेचे रजिस्टर,
शिक्षक रजा अर्ज फाईल,
वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
पाठ टाचण वही,
पगारपत्रक फाईल,
मुख्याध्यापकांचे लॉगबुक
३)आर्थिक अभिलेखे
स.शि.अ. रोकड रजिस्टर,
स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
स.शि.अ. लेजर रजिस्टर,
सादील रोकड रजिस्टर,
सादील खर्चाची पावती फाईल,
सादील लेजर रजिस्टर,
बांधकाम खर्चाची पावती फाईल,
बांधकाम रोकड रजिस्टर,
बांधकाम लेजर रजिस्टर,
शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
धनादेश नोंद रजिस्टर
४)शासकीय योजना अभिलेखे
मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
शालेय पोषण आहार रजिस्टर,
उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
उपस्थिती भत्ता देयके फाईल,
अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
दत्तक पालक योजना रजिस्टर
५)जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)
जंगम मालपुस्तिका,
सामान्य मालपुस्तिका रजिस्टर 
६)कार्यालयीन इतर अभिलेखे
पालक संपर्क रजिस्टर,
आरोग्य तपासणी रजिस्टर,
आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
परीक्षा पेपर फाईल

अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव - जतन करावयाचा कालावधी
(01) अ] सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर -कायम
(02) अ] फर्निचरग्रंथालयप्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही -कायम
(03) अ] परिपत्रकेआदेश फाईल -कायम
(04) अ] भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही -कायम
(05) अ] मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम
(06) ब] रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) -30 वर्षे
(07) ब] कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्यावेतनस्थिती -30 वर्षे
(08) ब] विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल -30 वर्षे
(09) ब] नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र -30 वर्षे
(10) ब] रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) -30 वर्षे
(11) ब] विद्यार्थी संचयी नोंदपत्रक -30 वर्षे
(12) ब] सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत -काम करीत असेपर्यंत व नंतर वर्षे
(13) क-1] इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे -10 वर्षे
(14) क-1] शाळा सोडल्याचे दाखले -10 वर्षे
(15) क-1] फीपावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही -10 वर्षे
(16) क-1] आकस्मिक खर्च नोंदवहीबिले प्रमाणके -10 वर्षे
(17) क-1] विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके -10 वर्षे
(18) क-1] वसतिगृह खोलीभाडे नोंदवही -10 वर्षे
(19) क-1] महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार -10 वर्षे
(20) क-1] फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती -10 वर्षे
(21) क-1] सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) -10 वर्षे
(22) क-2] जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही -वर्षे
(23) क-2] आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब -वर्षे
(24) क-2] रोकडवही (शा. पो. आ.) -वर्षे
(25) क-2] शाळा व्यवस्थापन समितीशिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही -वर्षे
(26) ड] सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) -18 महिने
(27) ड] शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज -18 महिने