Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Thursday 31 March 2016

ज्ञानरचनावाद गृहितके

ज्ञानरचनावाद गृहितके


१)विद्यार्थी स्वत:चे स्वत कृती करून शिकतील.
२)स्वतच्या प्रेरणेने व आवडीनुसार कृती करतील.
३)अनेक प्रकारचे अनुभव विद्यार्थांना मिळतील.
४)विद्यार्थी सतत काहीतरी करत करत शिकतील.
५)विद्यार्थी एकमेकांची मदत घेतील.
६)विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करतील.
७)मुल स्वतच्या गतीन शिकतील.
८)मुलांना अध्ययनाच्या अनेक संधी मिळतील.
९)विद्यार्थांना निवडीचे स्वातंञ्य मिळेल.
१०)शिक्षणातील एकसारखेपणादूर होईल.
११)विद्यार्थांच्या कृतीला प्रोत्साहन मिळेल.
१२)शिक्षणातील आंतरक्रीया प्रभावी होईल.
१३)सहअध्ययनामुळे विद्यार्थातील सामाजिकता वाढेल.
१४)आपणहून शिकणे या शिकण्याच्या नैसर्गिक प्रवृतीला चालना मिळेल.
१५)स्वातंञ्य, स्वयंस्फुर्ती,कल्पकता, निर्मितीक्षमता या गुणांना पोषक वातावरण मिळेल.
१६)मुक्त अभिव्यक्तीची संधी मिळेल.
१७)विद्यार्थी प्रकटीकरणाचे स्वातंञ्य अनुभवेल.
१८)समस्या सोडविण्यासाठी आवश्यक गुण विद्यार्थात येतील.
१९)शिक्षणातील छोटी छोटी आव्हाने पेलण्याचे स्वातंञ्य मुलांत विकसित होईल.
२०)विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करू शकेल. म्हणजेच ज्ञानाचा रचियता असेल.
२१)विद्यार्थांत शोध घेण्याची वृती वाढेल.
२२)तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी शिकेल.
२३)जिज्ञासा ,उत्सुकता वाढीस लागेल.
२४)स्वंय अध्ययनाची सवय लागेल.
२५)शिक्षणप्रक्रीया आनंददायी होईल.
२६)मुलांना शिकण्यास आवडेल,परंतु केवळ पाठांतर करणे आवडणार नाही.
२७)विद्यार्थांना अभ्यासात रमणे आवडेल.

संकलित मूल्यमापन 2 बाबत..

संकलित मूल्यमापन 2 बाबत..

📚 संकलित मूल्यमापन 2 बाबत..

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत पाठवण्यात आलेल्या पेपरच्या आधारे,

📌पाच एप्रिलला भाषा..

📌सहा एप्रिलला गणित..

विषयाची परीक्षा घ्यायची आहे..

इतर विषयांच्या परीक्षेसाठी शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत.

ही परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या आठ माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

 चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा त्याचदिवशी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..

चाचणीमधील विषयनिहाय एकूण गुणांची नोंद 'सरल' प्रणालीत करावयाची आहे..

याखेरीज राज्यस्तरावरून ई-निविदा पद्धतीने पुण्याच्या मॅस्कॉन कॉप्युटर्स सर्व्हिसेसची त्रयस्थ संस्था म्हणून निवड करण्यात आली.

या संस्थेच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांत चाचणी घेण्यात येणार आहे..

अशा पद्धतीने राज्यातील दोन हजार शंभर शाळांत ही चाचणी होईल..

चाचणी घेताना पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून दाखवत असतानाच समजावून सांगायचे आहेत..

इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही प्रश्न वाचून दाखवायचे आहेत..

इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अडचण असल्यास अथवा त्यांनी शंका उपस्थित केल्यास प्रश्न वाचून दाखवायचा आहे..

भाषा विषयात काही प्रश्नांना अपूर्णांकात गुण मिळू शकतात. सर्व प्रश्नांच्या गुणांची बेरीज करून ती अपूर्णांकात आल्यास एकूण गुण पूर्णांकात द्यायचे आहेत..

या चाचणीसाठी भाषा विषयासाठी शहरी व ग्रामीण असे प्रश्नपत्रिकेचे प्रकार केले नाहीत..


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम प्रश्नावली

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम प्रश्नावली



प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 

प्रश्नावली

१)            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय आहे?

उत्तर  : प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सर्वाना व्हावी. शिक्षकांना मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत करणे हा मुख्य हेतू आहे.

२)   प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत वर्षभरात किती चाचण्या घेण्यात येणार आहेत?

उत्तर  : तीन

३)             चाचण्या कोणत्या प्रकारच्या असतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी ,संकलित चाचणी १ व संकलित चाचणी २

४)            या चाचण्या कोणत्या कालावधीत होतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी माहे सप्टेंबर २०१५  , संकलित १ माहे नोव्हेंबर २०१५ आणि संकलित २ माहे एप्रिल २०१६

५)            पायाभूत चाचणी  कोणत्या क्षमतांवर आधारीत राहील?

उत्तर  : पायाभूत चाचणी मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता व त्या त्या इयत्तेच्या प्रमुख क्षमता

६)            संकलित मूल्यमापन १ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?

उत्तर  : संकलित मूल्यमापन १ सत्रांत चाचणी ही मागील इयत्तेपर्यंतच्या मुलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.

७)            संकलित मूल्यमापन २ चाचणी कोणत्या क्षमतांवर आधारित असेल?

उत्तर  : संकलित मूल्यमापन २  सत्रांत चाचणी मुलभूत क्षमता,पहिल्या आणि दुसऱ्या सत्राखेर पर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्न या चाचणीमध्ये असतील.

८)            चाचणी आयोजनात लेखी चाचणीसाठी किती वेळ लागेल?

उत्तर  : चाचणीसाठी वेळेचे बंधन नाही. संपूर्ण दिवसभरात मुलांच्या गतीने चाचणी घेण्यात येईल.

९)            या चाचण्या किती गुणांची असतील?

उत्तर  :  चाचण्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील  भारांशानुसार असतील.

१०)       चाचण्यांचे इयत्तानिहाय गुणांकन कसे राहील?

उत्तर  : इयत्ता पहिली व दुसरी - ३० गुण, इयत्ता तिसरी व चौथी- ४० गुण , पाचवी व सहावी- ५० गुण तर सातवी व आठवी- ६० गुण

११)       चाचण्या कोणत्या इयत्तांसाठी असतील?

उत्तर  : पायाभूत चाचणी इयत्ता दुसरी ते आठवी तर संकलित चाचण्या इयत्ता पहिली ते आठवी

१२)       चाचण्या कोणत्या विषयांसाठी असतील?

उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये प्रथम भाषा व गणित विषयांसाठी

१३)       चाचण्या कोणत्या व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील?

उत्तर  : चाचण्या राज्यातील सर्व व्यवस्थापन, बोर्ड व माध्यमांच्या शाळांसाठी लागू राहतील

१४)       चाचण्या कोण घेणार?

उत्तर  : वर्गशिक्षक

१५)       चाचण्यांसाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती कोण करणार?

उत्तर  : शिक्षक ,पर्यवेक्षीय अधिकारी,शिक्षणतज्ञ व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे (विद्यापरिषद)

१६)      सर्व व्यवस्थापन , माध्यम व बोर्डांच्या शाळांसाठी एकाच प्रकारच्या  प्रश्नपत्रिका असतील का?

उत्तर  : होय

१७)      प्रश्नपत्रिकांची निर्मिती करताना ग्रामीण आणि शहरी भाग स्वतंत्रपणे विचारात घेतला आहे का?

उत्तर  : होय. प्रथम भाषेच्या इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी

१८)       चाचणी बाबत व प्रश्नांच्या स्वरूपाबाबत अधिकची स्पष्टता कोठे मिळेल?

  उत्तर  : या संदर्भात दिनांक ७ जुलै २०१५ चे शासन परिपत्रक वाचावे.

१९)      चाचण्या पाठ्यांशावर आधारित असतील की क्षमतांवर आधारित असतील?

उत्तर  : प्रश्न क्षमतांवर आधारित असतील.

२०)      शाळेची श्रेणी कशी ठरविणार ?

उत्तर  : सर्व मुलांच्या गुणांवरून शेकडा प्रमाण विचारात घेऊन श्रेणी निश्चित केली जाईल.

२१)      शाळेची श्रेणी निश्चित करताना माझी समृद्ध शाळा व ग्रामविकास विभागाचे मूल्यमापन श्रेणीचा विचार केला जाणार का?

उत्तर  : नाही.

२२)      सेमी इंग्रजी वर्गाच्या चाचण्या घेताना गणित विषयाची चाचणी कोणत्या भाषेतून घ्यावी?

उत्तर  : इंग्रजी

२३)      चाचण्या घेताना एका वर्गाचा शिक्षक दुसऱ्या वर्गावर पाठवायचा का?

उत्तर  : नाही

२४)      चाचण्या घेण्यासाठी विद्यार्थांची बैठकव्यवस्था वेगळी असावी का?

उत्तर  : नाही.

२५)      राज्यात चाचणी एकाच दिवशी घ्यायची का?

उत्तर  : विद्यापरिषदेने निर्धारित केलेल्या कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.

२६)      चाचणी दिवशी काही कारणांनी विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्या विद्यार्थ्याची नंतर चाचणी घ्यायची का?

उत्तर  : निर्धारित कालावधीत कोणत्याही दिवशी चाचणी घेण्यात येईल.

२७)      एखाद्या विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी एका शाळेत घेतली अन काही कारणांस्तव त्या विद्यार्थ्याची शाळा बदलली तर त्याची संकलित चाचणी कोणत्या शाळेने घ्यायची?

उत्तर  : संकलित चाचणीच्या वेळी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेने चाचणी घ्यावी.

२८)      पायाभूत चाचणी नंतर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला तर दुसऱ्या शाळेने त्याची पायाभूत चाचणी पुन्हा घ्यायची का?

उत्तर  : नाही.

२९)       एखादा विद्यार्थी पायाभूत चाचणीच्या वेळी गैरहजर असेल अन त्यानंतर तो एकदम संकलित १ चाचणीच्या वेळी हजर राहिला तर त्याची पायाभूत व संकलित १ अशा दोन्ही चाचण्या घ्यायच्या का?

उत्तर  : नाही. मात्र संकलित चाचणी १ घेण्यात यावी.

३०)      संचयी नोंद पत्रिकेत विद्यार्थ्याचे पायाभूत चाचणीचे गुण लिहायचे का?

उत्तर  : नाही.

३१)      नसल्यास ,गुण नोंदविण्याची कार्यपद्धती काय राहील?

उत्तर  : सरल संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्यात येईल.

३२)      चाचण्या कोण तपासणार?

उत्तर  : वर्गशिक्षक/ विषय शिक्षक

३३)      तीनही प्रकारच्या चाचण्यामध्ये मुल अप्रगत आढळल्यास त्याला त्याच वर्गात ठेवायचे का?

उत्तर  : नाही.

३४)      शाळाबाह्य मुलांच्या चाचण्या घ्यायच्या का?

उत्तर  : होय

३५)      होय असल्यास कशाप्रकारे घ्यायच्या?

उत्तर  : शाळाबाह्य मुलाला नियमित शाळेत दाखल करून चाचण्या घेण्यात येतील.

३६)      पायाभूत चाचणीसाठी येणारा खर्च कोण पुरविणार ?

उत्तर  : प्रश्नपत्रिका छपाई व पुरवठा यासाठीचा खर्च राज्यशासन करेल.

३७)      प्रश्नपत्रिकांची छपाई व पुरवठा कोणामार्फत करण्यात येईल?

उत्तर  : विद्यापरिषद ,पुणे

३८)      ४० % पेक्षा कमी गुण असणारे मुल शिकण्यासाठी काय करावे?

उत्तर  : आधुनिक अध्ययना अध्यापन पद्धतीवर विशेष कृती कार्यक्रम विकसित करावा.

३९)      वर्गाची गुणवत्ता ठरविताना सतत गैरहजर विद्यार्थ्यासह वर्गाची गुणवत्ता काढायची का?

उत्तर  : होय

४०)      एखाद्या वर्गामुळे शाळेची श्रेणी घसरत असेल तर त्या शिक्षकावर कारवाई होणार का?

उत्तर  : नाही.

४१)      अप्रगत मुलांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाणार आहे का?

उत्तर  : नाही

४२)      संपूर्ण वर्ग किंवा शाळा  प्रगत झाल्यास शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल काय?

उत्तर  : नाही.

४३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्याचे काम कोण करणार?

उत्तर  : वर्गशिक्षक

४४)      अप्रगत विद्यार्थांना प्रगत करण्यासाठी शासन वेगळ्याने काही कार्यक्रम राबविणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४५)      अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तास घ्यावे लागतील काय ?

उत्तर  : नाही.

४६)      विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून शिक्षक , मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहले जाणार काय?

उत्तर  : होय

४७)      अप्रगत विद्यार्थ्याना प्रगत करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४८)      अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाकडून पुस्तिका किंवा काही साहित्य मिळणार आहे काय?

उत्तर  : नाही.

४९)      अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे ?

उत्तर  : शाळांमध्ये उपलब्ध असलेले व यापूर्वी शासनाकडून पुरविण्यात आलेले शैक्षणिक साहित्य.

५०)      : सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे कटी टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?

उत्तर  : १० %

५१)      राज्यस्तरावर दोन प्रकारचे कोणते अहवाल संकलित केले जातील?

उत्तर  : १) निष्पती अहवाल २) प्रक्रिया अहवाल

५२)      निष्पती अहवाल व प्रक्रिया अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे ?

उत्तर  :विद्यापरिषद ,पुणे

५३)      अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी कोणती पद्धती उत्कृष्ट आहे?

उत्तर  : ज्ञानरचनावादास धरून बहुवर्ग बहुस्तर अध्यापन

५४)      शिक्षकांनी कोणत्या बाबींमध्ये सक्षम राहणे आवश्यक आहे?

उत्तर  : विषयज्ञान , अध्यापन पद्धती व बालमानसशास्त्र

५५)      शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे?

उत्तर  :शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण

५६)      भाषा व गणित विषयाचे उत्कृष्ट प्रशिक्षक कोठून मिळणार आहेत?

उत्तर  : सन २०१५-१६ मध्ये दिनांक २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार निवड करण्यात आलेल्या नवोपक्रम शाळांमधून

५७)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन म्हणजे काय?

उत्तर  : स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मूल्यमापन

५८)      त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन घेणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे होत नाही का?

उत्तर  : नाही,

५९)       त्रयस्थ संस्थेची निवड कशी होणार?

उत्तर  : विद्यापरिषदेकडून या कामाचा अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे अर्ज मागवून विहित प्रक्रियेद्वार निवड करण्यात येईल.

६०)      त्रयस्थ संस्थेच्या मुल्यामापनासाठी शाळांची निवड कशी करणार?

उत्तर  : यादृच्छिक (random)पद्धतीने

६१)      वर्गशिक्षकाने घेतेलेल्या पायाभूत चाचणी व त्रयस्थ संस्थेद्वारा घेतलेल्या संकलित चाचणी १ किंवा २  मधील मुलांच्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास वर्गशिक्षकांवर कारवाई होणार का?

उत्तर  : नाही.

६२)      त्रयस्थ संस्था त्यांच्या स्वत:च्या प्रश्नपत्रिका वापरून चाचणी घेणार का?

उत्तर  : नाही

६३)      मुलांना शिकविण्याची पूर्ण जबाबदारी कोणाची?

उत्तर  : शिक्षकांची

६४)      शिक्षकांना कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य असेल?

उत्तर  : वर्गामध्ये शिकविण्याची पद्धत , साहित्य इत्यादी बाबत

६५)      अप्रगत विद्यार्थ्यांना काय अध्यापन केले जाते याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून वेळोवेळी पर्यवेक्षण होणार आहे का?

उत्तर  : नाही.

६६)      गुणवत्ता वाढीसाठी पर्यावेक्षानाच्या दृष्टीने पोषक घटक कोणते ?

उत्तर  : मदत , समुपदेशन , सुलभीकरण ,मेंटरिंग

६७)      पर्यवेक्षीय यंत्रणेने मुलांची गुणवत्ता कशी तपासावी?

उत्तर  : मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून

६८)                              वर्गाची व शाळेची वार्षिक तपासणी पूर्वीच्याच पद्धतीने होणार का?

उत्तर  : नाही.

६९)      प्रथम भाषा व गणित विषयांचे आकारिक मूल्यमापन करायचे का?

उत्तर  : होय

७०)      आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी करायच्या का?

उत्तर  :होय

७१)      अप्रगत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना साधारण व प्रगत मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील ?

उत्तर  : बहुस्तर

७२)      एकाच शिक्षकाने एकापेक्षा अधिक  वर्गांना अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धती योग्य राहील?

उत्तर  : बहुवर्ग

७३)      शिक्षकाला प्रशिक्षणाची मागणी कोणाकडे नोंदवावी?

उत्तर  : केंद्रप्रमुख

७४)      प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका काय असेल?

उत्तर  : शिक्षकांना आवश्यक तेथे मदत आणि या कार्यक्रमाबाबत पालक व समाजामध्ये जागृती

७५)      शासन कोणत्या शाळांना tablet देणार ?

उत्तर  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना

Saturday 26 March 2016

RTE 2009

       सदर अधिनियम १एप्रिल २०१० पासून लागू झालेला आहे. त्याच 

दिवसापासून ८६ व्या घटनादुरूस्ती नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना 

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसुचित करण्यात 

आले.
     सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक

कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये. 
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार. 
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध . 
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.  
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये  सुधारणा अधिकार . 
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती 
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक  २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी  प्रतिबंध.
 कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता  प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण. 
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक ३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.


महत्वाच्या वेबसाईट 1


शासकीय संकेत स्थळे

महत्वाची संकेत स्थळे
शिक्षकांनी बनवलेल्या वेबसाईट